अत्रें बाबत

आचार्य अत्रे यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी सासवडमध्ये (पुणे, भारत) झाला.

प्रल्हाद केशव अत्रे हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व मानलं जातं. साहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. या सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचा विलक्षण दबदबा होता. जनमानसावर त्यांचा प्रचंड पगडा होता. ते फर्डे वक्ते होते. आपल्या वक्तृत्वाने ते श्रोत्यांना भारावून टाकत असत.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. काही काळ ते महाराष्ट्र विधानसभेत आमदारही होते. त्यांच्या काळातही विद्वान व साहित्यिकांबरोबर त्यांचे वादही खूप गाजले. आचार्य ही बिरुदावली त्यांना प्राप्त झाली होती. तेव्हाचे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन (Dr Sarvapallli Radhakrishnan) यांनी त्यांचे `रायटर अॅन्ड फायटर ऑफ महाराष्ट्र` (Writer and Fighter of Maharashtra) असं यथार्थ वर्णन केलं होतं.

about
12
Years of experience
257
happy clients
192
projects completed