एक वक्ता

आचार्य अत्र्यांचं लेखणीइतकंच वाणीवरही जबरदस्त प्रभूत्व होतं.

त्यांची भाषणं म्हणजे श्रोत्यांकरिता मेजवानीचं असें. म्हणूनच त्यांच्या सभांना विक्रमी गर्दी होत असे. भाषण करताना उभे राहण्याची त्यांची ढब, हावभाव व वक्तृत्वशैली यांचा प्रभाव इतका होता की, इतर अनेक वक्त्यांनी त्यांचं अनुकरण केलं. अत्र्यांच्या वाणीतून आणि लेखणीतून त्यांचं चतुरस्त्र व्यक्तिमत्व प्रकट होत असे. शंकरराव देव, एस.एम. जोशी, बाळासाहेब ठाकरे, ना.सी.फडके, श्री.म. माटे, मामा वरेकर अशा अनेकांबरोबर त्यांनी घातलेले वादही खूप गाजले.

atre_speaker
12
Years of experience
257
happy clients
192
projects completed

आचार्य अत्रे यांची काही अजरामर भाषणे

Babasaheb Ambedkar

मराठी पत्रकार व लेखक यांच्या वतीने भारतातील एका महान विभूतीला मी आदरांजली अर्पण करण्यास उभा आहे. या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूला मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे. मरणानेच आज आपले हसू करून घेतले आहे. मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत? मग त्याने इतिहास निर्माण करणाऱ्या इतिहासाच्या या पर्वावरच का झडप घातली?

महापुरुषांचे जीवन पाहू नये असे म्हणतात. पण त्यांचे मरण आपण पाहत आहोत. भारतात असा युगपुरुष शतकाशतकांत तरी होणार नाही. झंझावाताला मागे सारणारा, महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. असा शूरवीर, बहाद्दर पुरुष आज मृत्यूच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे. त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाहीत. अशी एकही गोष्ट नाही की, त्याविरुद्ध ‘बाबां’नी बंड पुकारले नाही. अन्याय जुलूम ,जबरदस्ती, विषमता जेथे दिसली तेथे त्या वीराने आपली गदा उगारली . महात्मा गांधीना वाचविण्यासाठी आपल्या लाखो अस्पृश्य बांधवांचे कायमचे नुकसान करूनही, त्यांनी पुणे करारावर सही केली.

ते कच्चा गुरुचे चेले नव्हते . बुद्ध, कबीर, फुले हे त्यांचे गुरू होते. अस्पृश्यता जाळा असे म्हणणारा हा पुरुष स्वतंत्र भारताच्या घटनेचा शिल्पकार बनला. त्यांना आम्ही छळले—-सरकारने छळले. अशा परिस्थितीत मी हिंदू म्हणून जन्मलो तरी मरतांना हिंदू म्हणून मरणार नाही. हे त्यांनी खरे करून दाखविले. कारण आपल्याला ठाऊकच आहे की बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता. शोक करणे त्यांना आवडणार नाही. आज त्यांचा प्राण त्यांच्या कुडीतून बाहेर पडून सात कोटींच्या शरीरात शिरला आहे. त्यांचे चारित्र्य, निर्भयपणा व दुसरे गुण अंगी बाणवून आपण त्यांचे कार्य पूर्ण केले पाहिजे. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

महामानवास त्रिवार अभिवादन.

जयभीम! जयभारत! नमो बुद्धाय!

Anim pariatur cliche reprehenderit, enim eiusmod high life accusamus terry richardson ad squid. 3 wolf moon officia aute, non cupidatat skateboard dolor brunch. Food truck quinoa nesciunt laborum eiusmod. Brunch 3 wolf moon tempor, sunt aliqua put a bird on it squid single-origin coffee nulla assumenda shoreditch et. Nihil anim keffiyeh helvetica, craft beer labore wes anderson cred nesciunt sapiente ea proident. Ad vegan excepteur butcher vice lomo. Leggings occaecat craft beer farm-to-table, raw denim aesthetic synth nesciunt you probably haven't heard of them accusamus labore sustainable VHS.